शुक्रवार, २२ मे, २०२०

क्रॉसफिट चे युग

                     क्रॉसफिट चे युग

  जिम मधील व्यायाम आता मागे पडला आहे  अनेक जणांना माहीत नाही की क्रॉसफिट म्हणजे काय,क्रॉसफिट ची ट्रेनिंग काशी असते, क्रॉसफिट केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात. तर क्रॉसफिट  म्हणजे काय ते जाणून घेऊ.
      ग्रेग ग्लासमन आणि लॉरेन जेनाई यांनी २००० मध्ये क्रॉसफिट खेळ अमेरिकेमध्ये चालू केला. आणि आता जगभरातील लाखो लोक करीत असलेला व्यायामप्रकार. मेहनतीसाठी लागणारा दम वाढवणे आणि कोणतेही शारीरिक आव्हान पेलण्यासाठी तयारी करणे यासाठी अधिक तीव्र असे व्यायामप्रकार एकत्रितपणे करणे या तत्वावर ‘क्रॉसफिट’ चालते. एरोबिक व्यायाम प्रकार, वेट लिफ्टिंग आणि जिमनॅस्टिक्स या सर्वांचा ‘क्रॉसफिट’ व्यायाम सत्रात समावेश असतो.जिम मध्ये व क्रॉसफिट मध्ये जमीन आस्मानाचा फरक आढळतो. जसेकी जिम मध्ये एक दिवशी एकाच भाग(मसल)चा व्ययाम केलाजतो तसे क्रॉसफिट मध्ये तसे नसते यामध्ये शरीरातील अधिक भागांचा व्यायाम होतो उदा.Snatch-Pushups-Runing
   ●  Content  Variety, Functional Movment,High Intensity या तीन गोष्टीवर जास्त भर देण्यात आला आहे.ते आपण पाहू.
1.Content  Variety
     Contanty varied म्हणजे प्रत्येक दिवशी वेगळा व्यवयाम प्रकार,तर असे केल्याने शरीरातील काही भागांवर व्यायामाचा परिणाम न होत शरीरातील सर्व भागांवर परिणाम होतो.आपले शरीर चांगले कार्यशील बनते.
2.Functional Movement
      आपण जे दैनंदिन जीवनात कामे करतो जसे की बसने,उटणे, फेकणे, ओढणे,उचलणे हीच कामे काही साहित्यांद्वारे होते  यामध्ये शरीरातील सर्व अवयवांचा चांगल्याप्रकारे प्रकारे वापर होतो. व कार्य करण्याची क्षमता वाढते.
3.High Intensity
     हाय इंटनसिटी म्हणजे जास्त शक्ती ने कार्य करणे, जसेकी रनिंग (जॉगिंग व रनिंग मध्ये फरक आहे) म्हणजेच कमी वेळेत जास्त अंतर धावणे.
 फायदे-
      क्रॉसफिट मुळे आपल्या शरीरातील सर्व भागांचा चांगल्याप्रकारे व्ययाम होतो.बोन व लिगमेंट चांगले होते,आपणास थकवा जाणवत नाही, आपली कार्यशक्ती वाढते, तसेच चपळता येते शरीर काटक बनते.
      या खेळातील व्यवयामप्रकार विविध खेळामध्ये घातला तर खेळाडूंची कार्यक्षमता, ताकद,शरीराची चपळता लवचिकता चांगल्याप्रकारे होईल. 
      ‘क्रॉसफिट’ मधील मिश्र व्यायाम पद्धतीचा फायदा झालेले अनेकजण त्याच्या परिणामकारकतेची ग्वाही देतात. हा कठोर व्यायाम एक तासाहून कमी वेळ चालतो पण शारीरिक कष्टाची गरज असलेला, त्यातील अति वेगामुळे कवचित कधीतरी इजा पोहोचवणारा असतो.
      भारतामध्ये अजून हा खेळ व व्यव्यवम प्रकार फार कमी लोकांना माहीत आहे.दिल्ली मुंबई व बेंगलोर या या ठिकाणी चांगल्याप्रकारे या खेळाची व व्यव्यवम प्रकारांची आवड लोकांमध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे .
      मी खाली  4 लिंक दिलेल्या आहेत त्यामध्ये साधारणपणे ट्रेनिंग काशी असते ते पहिल्या 2 लिंक मध्ये आहे, व स्पर्धा कशा असतात ते दुसऱ्या 2 लिंक मध्ये आहे. ते दाखवले आहे जरूर बघा.  यामध्ये घरी करतायेईल असेही व्यायाम प्रकार आहेत.
1. https://youtu.be/n5LbbftRaDs
2. https://youtu.be/IBuwNheltdI
3. https://youtu.be/PMSjZWB5p7M
4. https://youtu.be/azrCedN7gs0

१६ टिप्पण्या:

  1. आपण दिलेली माहिती ही खुप उपयुक्त आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खुप चांगली माहिती आहे ,आसीच नविन माहिती मिळावी

    उत्तर द्याहटवा
  3. अतिसुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर👌🏻

    उत्तर द्याहटवा

दोरी उड्या (ROPE SKIPPING)

     अनेक मित्र मला विचारतात दोरी उड्या कशा मारायच्या काय करायला हव तसेच दोरी उड्या  मारल्यामुळे कोण कोणते फायदे होतात,दोरी उड्...