गुरुवार, ११ जून, २०२०

फार्टलेक ट्रेनिंग पद्धत

                             फार्टलेक ट्रेनिंग     



काय असते फार्टलेक ट्रेनिंग, कशी करायची असते, कधी करायची ,कोण करतात फार्टलेक ट्रेनिंग हे आपण जाणून घेऊ.
     फार्टलेक म्हणजे वेगाशी खेळणे(speed play).फार्टलेक ट्रेनिंग ही सर्वजण करु शकतात, ही  ट्रेनिंग पद्धत जास्त प्रमाणात विविध कसरतीचे खेळ करणारे खेळाडू करतात (उदा. धावणारे खेळाडू ) . तर आपण जाणून घेऊ की काशी असते फार्टलेक ट्रेनिंग.
 फार्टलेक ट्रेनिंग :-
      जसेकी वरती मी सांगितलं की फार्टलेक म्हणजे वेगाशी खेळणे.ही पद्धती 20 ते 40 मिनिट पर्यन्त असते आपल्या क्षमतेनुसार आपण वेळ वाढवू शकतो, ट्रेनिंग चालू असता कोठेही थांबायचे नसते (No Rest). उदा.आपण धावन्याची गती काही मिनिटे कमी करायची असते व पुन्हा गती वाढवायची असते,जसेकी 1मिनिट वेगाने पाळायचे व1 मिनिट वेग कमी करून पाळायचे याचे 10 सेट करावेत. यामुळे आपला वेग वाढतो. विविध खेळामध्ये याचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो(उदा.बॅडमिंटन, बॉक्सिंग,फेन्सिंग,व्हॉलीबॉल.) 
      ही ट्रेनिंग आपण ग्रुप मध्ये तसेच वैयक्तिक शकतो.या पद्धतीचा वापर आपण आठवड्यातून एकदा करायला हवा. 
फायदे :-
      फार्टलेक ट्रेनिंग केल्यामुळे आपले शरीर सुदृढ बनते, आपला स्टॅमिना वाढतो, चपळता येते, आपली कार्य करणयाची क्षमता वाढते कामामध्ये उत्साह येतो या सारखे अनेक फायदे आपणास मिळतात. तसेच आपल्या दैनंदीन जीवनात काम जास्त आसेल तर काम करण्याची क्षमता वाढवते.
    मी काही फार्टलेक ट्रेनिंग पद्धतेचे प्रोग्रॅम दिले  आहेत त्यानुसार  आपण  ट्रेनिंग करावी व आपल्या क्षमतेनुसार वेळेमध्ये बदल ही करू शकता.    



      काही  शंका असतील तर कमेंट मध्ये सांगा. 

९ टिप्पण्या:

  1. एकदम उत्तम मांडणी केली।आहे खुप छान

    उत्तर द्याहटवा

दोरी उड्या (ROPE SKIPPING)

     अनेक मित्र मला विचारतात दोरी उड्या कशा मारायच्या काय करायला हव तसेच दोरी उड्या  मारल्यामुळे कोण कोणते फायदे होतात,दोरी उड्...