बुधवार, ६ जानेवारी, २०२१

दोरी उड्या (ROPE SKIPPING)

     अनेक मित्र मला विचारतात दोरी उड्या कशा मारायच्या काय करायला हव तसेच दोरी उड्या  मारल्यामुळे कोण कोणते फायदे होतात,दोरी उड्या कोणी माराव्या, कुठे माराव्या,दोरी केवढी असावी ते आज आपण पाहू.
  दोरी उड्या हा चांगला व्यायाम आहे. दोरी उड्या हा खेळ देखील आहे. पूर्वी लोक साध्या दोरीवर उड्या 
मारायचे आत्ताच्या पद्धतीमध्ये रबरी प्लास्टिक च्या दोरी  आल्या आहेत. जेणेकरून उड्या मारताना स्पीड लागेल व उड्या जास्त जातील याकरिता लोक रबरी व प्लॅस्टिकच्या दोरी उड्या वापरणे पसंत करतात.

  •दोरी उड्या मारण्याच्या अगोदर  बॉडी वर्मा  करणे व बॉडी स्ट्रेच करणे अत्यंत आवश्यक असते.
 •दोरी उड्या ह्या लहानांपासून वृद्धापर्यंत कोणी ही मारू शकतो. 
•दोरी कशी असावी- दोरी आपल्या उंचीपेक्षा तीन फूट जास्त असावी,तसेच दुसरी पद्धत आहे की खाली दोरीचे शेवटचा भाग धरून दोन्हीं मूठा  छातीजवळ आल्या पाहिजेत.

दोरी उड्या कशी मारावी-.  
 1. सर्वप्रथम दोरीचा वापर करू नये जागच्या जागीच दोन ते तीन इंच उडी मारायला हवे, जास्त उंच उडी मारू नये तसेच गुडघे वरती उचलू नयेत,  पाय एकत्र जुळवून उड्या माराव्यात. व आपले हात कमरे च्या बाजूला ठेवावे पूर्ण हात फिरवू नये फक्त  हाताचे मनगट फिरवावे .

2. दुसऱ्या स्टेप मध्ये एका हातामध्ये दोरी घ्यावी व आपल्या एका बाजूने आपण उडी मारून तसे दोरी मनगटातून फिरवावे. एका हाताचे झाले की  दुसऱ्या हाताने दोरी धरून तशाच प्रकारे फिरवावी वरती सांगितल्या प्रमाणे पायाची व हाताची स्थिती तशीच असावी.
3. आता यामध्ये दोरी आपल्या दोन्ही हातामध्ये दोरी चेे मुुुठ धरुन वरती सांगितल्याप्रमाणे पाय व हाताची स्थिती तशचअसावी. एक उडी मारावी व दोरी फिरवावी व लगेच थांबावे, असे पन्नास ते साठ वेळा आपण करावे .एक सारख्या उड्या मारायचया लगेचच प्रयत्न करू नये. तसेच पाय जास्त वरती उचलू नये दोन ते तीन इंच उचलावे. व हात  कमरेच्या बाजूला ठेवावे. पूर्ण हात फिरू नये फक्त मनगट फिरवावे. व जास्त उंच उडी मारू नये गुडघे वरती उचलू नयेत. व दोरीची मुट दाबून धरू नये.


4. आता यामध्ये सलग दोन उड्या मारून थांबावे पन्नास ते साठ वेळा असे करावे.


5. आता यामध्ये आपण असे एकेक करत दोरी उड्या वाढवत जावे व दहा किंवा त्यापेक्षा जास्त दोरी उड्या मारण्याचा प्रयत्न करावा. 




6. एक आठवडाभर किमान 500 पेक्षा जास्त उड्या माराव्यात व तुम्ही आपल्या क्षमतेनुसार उड्या माराव्यात.
7. तुम्ही दुसऱ्या आठवड्याभरातच 100 पेक्षा जास्त न थांबता दोरी उड्या मारायला शिकल.तुम्हाला चांगल्या प्रकारे दोरी उड्या मारता आल्यावर नंतर तुम्हाला विविध  दोरी उडयांचे प्रकार मारता येतील.




   3. सावधानता कशी बाळगावी-  दोरी उड्या मारताना बऱ्याच दोरी पायना लागतील, व बोटांना देखील लागेल, व काही दिवस पायांना त्रास होईल. सवय नसल्यामुळे पाय दुखतील  पायामध्ये  शूज घालावा. तसेच मातीमध्ये दोरी उड्या मारण्याचा प्रयत्न करावा.काँक्रीट किंवा हार्ड जागेवर दोरी उड्या मारल्यास आपल्या पायांना त्रास होऊ शकतो.
     जेव्हा जास्त दम लागतो तेव्हा उड्या मारणे थांबवावे
एका गतीमध्ये दोरी उड्या माराव्यात . दोरी उड्या मारायच्या आधी थोडं पाणी प्यावं जेणेकरून उड्या मारताना मध्येच तहान लागणार नाही.

      फायदे-. 
1 कमी जागेत जास्त चांगल्या प्रकारे व्यायाम होतो.
2 एक मिनिट उड्या मारल्यावर 10 ते 16 कॅलरी ऊर्जा खर्च होतात.
3 दोरी उड्या मारल्या मुळे शरीरातील सर्व भागांची हालचाल होते.
4 दोरी उड्या मारल्यामुळे म , coordination, लय,चांगले होते. मेंदूचा देखील चांगल्या प्रकारे वापर होतो.
5 वजन कमी करण्यासाठी दोरी उड्या हा व्यायाम प्रकार चांगला आहे.
6 उंची वाढण्यास चांगली मदत होते.
दोरी उड्या मारल्या मुळे तोंडावर तेज येते मनगट दंड व पायामध्ये चांगल्या प्रकारे ताकत येतेतसेच स्टॅमिना देखील वाढतो हार्ट रेट देखील चांगला राहतो.
7 विविध खेळाडू देखील दोरी उड्या मारतात कारण बॅलेन्स चांगला होतो दोरी उड्या मारल्यामुळे स्पीड व स्वतःला खेळा मध्ये कंट्रोल करता येते.     

दोरी उड्या (ROPE SKIPPING)

     अनेक मित्र मला विचारतात दोरी उड्या कशा मारायच्या काय करायला हव तसेच दोरी उड्या  मारल्यामुळे कोण कोणते फायदे होतात,दोरी उड्...